- शहरातील सर्व दुकानं बंद राहणार; हॉटेल आणि रेस्टॉरंटला वगळले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरात घरगुती गणपती आणि गणरायाचं बाहेरून दर्शन घेण्यासाठी नागिरक गर्दी करू लागले आहेत. शहरच्या मध्यवर्ती भागातही गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीही शहरात गर्दी झाली होती. त्याच अनुषंगाने अजित पवारांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
”अनंत चतुर्दशीला पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दिवसभर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत, तसेच औषधांची दुकानं आणि दवाखाने सुरु राहतील असही ते म्हणाले आहेत.”
पुण्यातला साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यू दर कमी झाला आहे. मात्र जिल्ह्याचा रेट ००.०७ आहे. हा वाढीचा दर असल्यानं काळी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.”












