- कामावरून काढल्याचा राग गाडीवर; आरोपीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२१) :- आरोपीने आपल्या भावासोबत फिर्यादीच्या कारवर स्फोटक द्रव्य टाकून क्रेटा आणि इनोव्हा या दोन २२ लाखांच्या मोटारी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. १३) पहाटे इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे घडला.
आरोपी हा फिर्यादी महिलेकडे कारवर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी यांनी कामावरून काढून टाकले होते. यामुळे आरोपीने हे कृत्य केले. दोन्ही मोटारी जळून खाक झाल्या असून तब्बल २२ लाखांचं नुकसान झाले आहे
विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कारच्या मालकिणीने गुरुवारी (दि. १६) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत












