- वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२१) :- वाकडच्या कस्पटे वस्ती येथील ग्रीन व्हिलेज स्पा या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली.
आरोपी चार महिलांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजीविका भागवत होते. पोलिसांनी कारवाई करत चार महिलांची सुटका केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्पा सेंटर मॅनेजर दीपक नामदेव साळुंके (वय २४, रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. धुळे) आणि अमित विश्वनाथ काटे (वय ३२, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















