- सरकारी कामात अडथळा; दोघेजण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२१) :- ‘तुम्ही मला पकडू नका. तुम्ही जर मला पकडले तर मी तुम्हाला तलवारीने मारून टाकील’ अशा धमकी दिली. तसेच आरोपी पोलिसांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आला. त्यानंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ केला. पोलिसांनी दोघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान आरोपींनी पोलिसांशी झटापटी करून ‘तुम्हाला बघून घेतो’ असे म्हणत शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. प्राधिकरण येथे दोघेजण तलवार घेऊन थांबले असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी पोलीस आणि त्यांचे सहकारी कारवाई कारण्यासाठी गेले. शनिवारी (दि. १८) दुपारी ही घटना घडली.
पोलीस नाईक सोनू केंगले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शाहरुख शाहिद शेख (वय २०, रा. टॉवर लाईन चिखली), गजानन सहदेव पवार (वय २८, रा. दत्तवाडी, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
















