न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी जितेंद्र वाघ यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार (दोन) यांच्या रिक्त जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावर ते कार्यरत होते. त्यांची तीन वर्षांसाठी पालिकेत नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी तसे आदेश काढले आहेत.