न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. १४ जाने.) :- थेरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जनसेवा प्रतिष्ठानचा यावर्षीचा मानाचा कर्तृत्व गौरव पुरस्कार उन्नति सोशल फौंडेशनला मिळाला आहे. उन्नती सोशल फौंडेशनच्या समाजकार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे, संयोजकांनी यावेळी सांगितले.
यावेळी महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे, उद्योजक संजय भिसे, प्रतिष्ठानचे संस्थापक हरिष मोरे, अध्यक्ष दीपक पारखी आदी उपस्थित होते
उन्नत्ती सोशल फौंडेशनच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना उद्योजक संजय भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ”या पुरस्काराने आम्हाला समाजाची सेवा करण्यास आणखी बळ मिळणार आहे. समाजातील दुर्बल व वंचित तसेच गोर-गरीब नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यास उन्नती सोशल फौंडेशन कधीही कचरणार नाही. या पुरस्काराने आणखी आत्मविश्वास दुणावला असल्याचे भिसे यावेळी म्हणाले”.


















