- लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीची अट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ज्या अर्जदारांचा शिकाऊ परवाना सप्टेंबर २०२१ अखेरपर्यंत संपत आहे, अशांसाठी विशेष वाहन परवाना चाचणीचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर शनिवार (दि. २५) आणि रविवारी (दि. २६) विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी २३ व २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल.
स्लॉट बुक केलेल्या अर्जदारांनी वाहन परवाना चाचणीसाठी सकाळी ८ ते १० या वेळेत हजर रहावे, लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.