- कोरोना काळात कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- टाटा मोटर्स कंपनीने कामगारांना यंदा दिवाळीसाठी ३८ हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार रुपयांनी बोनस जास्त आहे. या निर्णयाचा फायदा सहा हजार कामगारांना होणार आहे. करोना संकटकाळातील दोन वर्षांसह सलग तीन वर्षे घसघशीत बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यातील चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिझनेस स्कोर कार्ड (बीएससी)चा आधार घेऊन बोनसचे सूत्र ठरवण्यात आले आहे. या सूत्रानुसार गेल्या वर्षी ३५ हजार २०० रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात तीन हजारांनी वाढ करण्यात आली आहे.
















