- पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल; पाच जण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांच्या अंगावर धावून गेले; तसेच साथीच्या रोग नियमांचे उल्लंघन केले. फिर्यादी पोलीस नाईक हे बुधवारी सकाळी मार्शल ड्युटीवर असताना सकाळी अकराच्या सुमारास ते शगुन चौक, पिंपरी येथे आले असता आरोपींनी रहदारीस अडथळा येईल अशा पद्धतीने पथारी लावली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना पथारी लावण्यास मनाई केली.
आरोपींनी पोलीस नाईक याना अरेरावी करून पथारी काढण्यास नकार दिला. ही घटना बुधवारी (दि. २२) सकाळी शगुन चौक, पिंपरी येथे घडली. पोलीस नाईक सिद्राम बाबा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
राजेश मिरचूमल मायारमानी (वय ६०), रेणू राजेश मायारमानी (वय २५), महंमद तबारक रैन (वय १८), मोहम्मद जुनैन शेख (वय २७, चौघे रा. पिंपरी), आस्मा हुसैन शेख (वय २४, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.