न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जाने.) :- येत्या पंधरा दिवसात शास्तीचा निर्णय मंत्रीमंडळात मी घेईन. शास्तीच्या संदर्भात सामान्य मानसाला दिलासा मिळाला पाहिजे. अशी घोषणा बुधवार (दि. ९) रोजी पिंपरी चिंचवड दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेची कार्यवाही करावी, याकरीता शनिवार (दि. १२) रोजी सर्व विरोधीपक्षीय नेत्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर ”पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो शास्तीकर माफ होतोय, असा ‘काऊंट डाऊन’चा फलक महापालिका भवनासमोर लावला होता.
विरोधी पक्षांच्या स्टंटची सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दखल घेतली असून, पिंपरी-चिंचवडकरांवर शास्तीकर लादण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकार काळात शास्तीकर अंमलबजावणी झाली असल्याचे सांगितले आहे. त्यांनी लादलेले ‘पाप’ ‘आम्ही धुवून’ काढायचे काम भाजप सरकार करत आहे, शास्तीचा प्रश्न सोडविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.











