न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जाने.) :- ५ वी राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धा दिनांक ४ ते ६ जानेवारी या कालवधीमध्ये पंजाब या ठिकाणी पार पडल्या. १४ वर्षे, १७ वर्षे, १९ वर्षाखालील तिन्हीही गटामधे महाराष्ट्राने आपले नेहमी प्रमाणे सलग ९ व्या वर्षीही आपली परंपरा अबाधित ठेवली. सदर स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिनांक ०१ ते ०३ या कालावधीत गोवा या ठिकाणी होणार आहेत.
या राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आकुर्डीतील बीना इंग्लिश मिडियम स्कूल येथे पार पडला. यावेळी आमदार गौतम चाबूकस्वार (अध्यक्ष ), हाजी इकबाल खान (आधार स्तंभ), हाजी दस्तगीर मनियार (चेअरमन), पी वाय. अत्तार (कार्याध्यक्ष), एस. डी. गायकवाड (सचिव) सर्व महाराष्ट्र थायबॉक्सिंग असो. पदाधिकारी यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
आमदार व राज्य संघटनेचे अध्यक्ष यांनी मुलांना शारिरीक तंदुरुस्ती असेल तरच उत्कृष्ट खेळाडू घडू शकतो. खेळाडूने नेहमी कणखर असले पाहिजे. त्याने स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय नेहमी उंच ठेवले पाहिजे. आपल्या पिंपरी चिंचवड शहर, महाराष्ट्राचे नाव तसेच देशाचे नाव उज्ज्वल करणेसाठी मेहनत करणे, हिच खरी देशभक्ती आहे. त्या सोबत फेब्रुवारी मधे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेस शुभेछा दिल्या.
हाजी इकबाल खान यानी खेळाडूंना जिंकने आणी हारने हे महत्वाचे नसून, कधीही खचून न जाता नेहमी प्रयत्नशील राहीले पाहिजे, असे प्रतिपादन केले. सत्कार समारंभ बीना इंग्लिश मेडियम स्कूल आकुर्डी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. डी. गायकवाड यांनी केले.
प्रो टायटल बेल्ट विजेती मुली
धनश्री बागूल, साक्षी देशपांडे
सर्व सुवर्ण पदक विजेत्या मुली
तृप्ती निंबले, दिवेश मिश्रा, गौरी शिंदे, साक्षी देशपांडे, प्रतिक्षा गायकवाड,
सर्व सुवर्ण पदक विजेते मुले
नंद्लाल वर्मा, किरण म्हसेकर, हेतल शहा, पियुश गायकवाड, पार्थ पंजाबी, विराट गावडे, भावनेश दानि, मानस चौधरी, विश्जीत खटक, सुनिल कदम, इरफान शेख,
सर्व रौप्यपदक विजेते मुले
हर्षद शिंदे, सागर पाटिल, वेदांत लागे,
सर्व कास्यपदक विजेते मुले श्रीराम सिंग, सीद्देश कुशवाह, अयुष नायर,अन्वेष अखाडे,
कास्यपदक विजेती मुलगी अदिती पवार,











