- तब्बल १७ कोटी, ३० लाखांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २५) रोजी राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान पिंपरी न्यायालयात ३५१ खटले निकाली काढण्यात आले. ४,२९,७५,४२९ रुपये महसूल जमा झाला. तर आकुर्डी पालिका न्यायालयात ६९१५ खटले निकाली काढत १३,००,६६, ११० रुपये महसूल जमा झाला. दोन्ही मिळून एकूण ७२६६ खटले निकाली काढण्यात आले. तर १७ कोटी, ३० लाख, ४१ हजार ५३९ रुपये महसूल जमा झाला आहे.
पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश डी. आर. पठाण, आर. एस. वानखेडे, आर. आर.काळे , पी.सी. फटाले, एन. टी. भोसले, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ उपस्थित होते.
या लोकअदालतीमध्ये पॅनल जज म्हणून अॅड. पल्लवी विघ्ने, अॅड. शुभांगी थोरात, अॅड. माधुरी दाते, अॅड. श्वेता निमसे, अॅड.मेघा पवार, अॅड. सारिका मोरे, अॅड. कांता गोरडे, अॅड. पूनम राऊत, अॅड.अविनाश पाटील, अॅड. संतोष मोरे, अॅड. शुभांगी थोरात, अॅड. श्रध्दा मंचरकर, अॅड. भाग्यश्री झुळूक, अॅड. संकल्पा वाघमारे यांनी काम पाहिले.