- शासकीय कामात अडथळा; त्या दोघांना भोवली जेलवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- दखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांचा तपास करण्यासाठी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी रस्त्यामध्ये लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. ते वाहन रस्त्याच्या कडेला घेण्याबाबत फिर्यादी समज देत होते.
त्यावेळी फिर्यादीने पोलिसांचा शासकीय गणवेश परिधान केला होता. असे असतानाही आरोपींनी फिर्यादीच्या गणवेशाची कॉलर पकडून घटनास्थळी भेट देण्यापासून फिर्यादीला परावृत्त केले. तसेच आरोपींनी शासकीय कामात अडथळा केला.
थेरगाव येथील कैलासनगर परिसरातील मोटादेवी मंदिराजवळ रविवारी (दि. २६) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नरेश पारख (वय ४०) व धर्मेंद्र पारख (वय ४०, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
















