- चिंचवडे, त्यांची पत्नी निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांचा पराभव झालाच पाहिजे..
- शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांचा गजानन चिंचवडेंवर घणाघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिचवडे यांच्या भाजपप्रवेशाचे पडसाद शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या सेनेच्या भोसरी मेळाव्यात उमटले. पिंपरी – चिंचवडचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपमध्ये चाकरी करायला दाखल झाले, त्यांना पक्षात घेऊन मी चूक केली होती, अशी टीका खा. श्रीरंग बारणे यांनी केली.
गोविंद गार्डन येथे झालेल्या या मेळाव्यास शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.मे
मेळाव्यात बोलताना मिर्लेकर म्हणाले, ‘गजानन चिंचवडे यांना लायकी नसताना पद दिले, तरी त्यांनी गद्दारी केली. त्यांना किंमत देऊ नका. त्यामुळे ते किंवा त्यांची पत्नी निवडणुकीस उभे राहिल्यास त्यांचा पराभव झाला पाहिजे.


















