न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जाने.) :- शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या वतीने नववर्ष २०१९ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पुणे जिल्हा समन्वयक व आमदार रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते मुबईतील दादर येथील शिवसेना भवनात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्र वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष महेश केदारी, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सदस्य मारूती म्हके, पिंंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, माऊली जाधव आदी उपस्थित होते,











