न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जाने.) :- मकर संक्रांतीच्या काळात शहरभर अनेक ठिकाणी पतंग उडविले जातात. हे पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला चिनी किंवा नायलॉनचा मांजा वापरला जातो. त्यामुळे अपघात होत असून, त्यास मज्जाव करण्याची मागणी, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, मांज्यामुळे गळा कापून मागील वर्षी याच काळात डॉक्टर तरुणीचा नाशिक फाटा येथे अपघात होऊन मृत्यू झाला होता. तसेच काळेवाडीत आणि पुण्यात काही तरुण व बालके चिनी मांजा कापल्यामुळे जखमी झाली होती. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील चायनिज व नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नूसार कडक कारवाईची मागणी केली आहे.











