न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जाने.) :- थरमॅक्स चौक ते केसबी चौक या दरम्यान रस्त्यावर ऑईल सांडले होते. या रस्त्यावर २५ पेक्षा जास्त वाहनांचा घसरून अपघात झाला होता.
या प्रसंगाची दखल घेत उद्योजक अमित गोरखे यांनी महापालिकेच्या अग्निशामक व पोलीस यंत्रानाना घटनास्थळी बोलावून घेतले. अग्निशामक जवानांनी रस्त्यावर माती व पाणी मारून रस्ता स्वच्छ केला. निगडीचे पोलीस अधिकारी वाघमोडे, परिसरातील नागरिक व मनपाच्या अग्निशामक दलाचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे अमित गोरखे यांनी सांगितले.











