- पालिकेकडून पाचशे शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायीच्या बैठकीत पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी देण्यात आली. बुधवारी (दि. २९ सप्टेंबर) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते. बैठकीस ३१ पैकी २२ विषयांना मंजूरी देण्यात आली. ऐनवेळचे ९ विषय अशा एकूण ३१ विषयांना मंजूरी देण्यात आली.
मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील पहिल्या टप्प्यात पाचशे शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान वापरुन गुगल क्लास रुम, मायक्रोसॉफ्ट टिम्स, झूम, व्हॉट्स अपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सोल्युशन्स यांना प्रती शिक्षक दोन हजार रुपये प्रमाणे दहा लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.