- काचा फोडून कारचेही नुकसान; वाकडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२१) :- आरोपी आणि फिर्यादीची मैत्रीण या दोघांचे सोमवारी रात्री भांडण झाले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या दोन मैत्रिणी यांनी मिळून तिला त्यांच्यासोबत घेऊन जात असताना आरोपी तिथे आला.
त्याने फिर्यादी यांना सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या कारच्या काचा फोडून कारचे नुकसान केले. हा प्रकार सोमवारी (दि. २७) रात्री विवेकानंद नगर, वाकड येथे घडला.
अमरनाथ काशिनाथ ढोणे (वय ३७, रा. भुजबळ चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमिर खलील खान (वय २६, रा. विवेकानंद नगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















