- भोसरीतील घटना; आरोपी अटकेत, एकावर गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- डॉक्टरला कोयत्याचा धाक दाखवत शिवीगाळ करून ‘तुला माहीत नाही का, मी भोसरीचा आहे. तू आत्ताच्या आत्ता तुझ्याकडे आहे तेवढे पैसे मला दे’, असे म्हणून आरोपीने डॉक्टराच्या पॅन्टच्या मागच्या खिशातील पैशाचे पाकीट काढून घेतले. त्यातील बाराशे रुपये, आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. तसेच आरडाओरडा करत दहशत निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण केली.
हा प्रकार भोसरीतील पुरुषोत्तम क्लिनिक येथे बुधवारी (दि. २९) रात्री घडला. डॉ. पुरुषोत्तम कारभारी राणे (वय ४१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी गुरुवारी (दि. ३०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सुदर्शन उर्फ पिल्या संभाजी राक्षे (वय २६), याला अटक केली असून गोविंद कोळी (रा. शास्त्री चौक, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.