- आरोपी अटकेत; गॅस एजन्सी मालकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- किवळेतील दत्तनगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी हा भरलेल्या गॅस सिलेंडरमधून लहान आकाराचे तीन ते पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत होता.
गॅस एजन्सी मालकाला माहिती असताना त्याने रिकामे खाली झालेले गॅस सिलेंडर गोडाऊन मध्ये जमा न करता भरलेले गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरित करण्यासाठी न जाता गॅस चोरीसाठी सहाय्य केले. आरोपींकडून २१ हजार ९०३ रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, ३०० रुपयांचे दोन पितळी धातूचे रिफील, २२० रुपयांचे दोन नारंगी पाईप असा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई बुधवारी (दि. २९) सकाळी सव्वादहाच्या दरम्यान घडली. अविनाश हरी नांगरे (वय २४, रा. दत्तनगर, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गॅस एजन्सीचा मालक संतोष (पूर्ण नाव माहिती नाही, रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
















