- अज्ञाताकडून क्यूआर कोडद्वारे आर्थिक फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- ओएलएक्सवर घरातील फ्रिज विक्रीसाठी फिर्यादीने जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून एका अज्ञात व्यक्तीने 9900974269 व 9394911568 या क्रमांकावरून फिर्यादी महिलेशी संपर्क केला.
फ्रिज खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेच्या फोनवर सहा वेळा क्यूआर कोड पाठवला. क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून महिलेची ४८ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली.
ही घटना १० सप्टेंबर रोजी रात्री पिंपरीत घडली. महिलेने बुधवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरील मोबाईल फोन धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















