- १२८ नगरसेवकांपैकी ६२ पुरुष तर, ६६ महिला नगरसेविका होणार?
- ४० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे काम पूर्ण होईल. हरकतींवर सुनावणी होऊन प्रारूप आराखडा तयार होईल. त्यानंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाईल. त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीमुळे चार महिला नगरसेविकांची संख्या जास्त राहणार आहे. गुगल मॅपिंगद्वारे सीमांकन होणार आहे. तूर्तास एक सदस्यीय वॉर्डरचनेचे काम थांबविण्यात आले आहे. राज्य निवडणुका आयोगाकडून आदेश प्राप्त होताच ३ सदस्यीय प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू केले जाईल , असे महापालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी २०२१ मध्ये निवडणूक त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यास वेग दिला. तीन सदस्यांचे ४२ प्रभाग तर, दोन सदस्यांचा प्रभाग होणार आहे. त्या ४३ प्रभागांपैकी २५ उमेदवार अशी विभागणी असणार. प्रभागांत दोन महिला, तर एक पुरुष आहे. १२८ नगरसेवकांपैकी ६२ पुरुष तर, ६६ महिला नगरसेविका असणार आहेत. चार महिला नगरसेविकांची संख्या जास्त राहणार आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, अशी शक्यता आहे.
महापालिका निवडणूक २०११ च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे. शहराची लोकसंख्या २७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यापैकी १३ लाख ५० हजार मतदार आहेत. नगरसेवकाची संख्या १२८ राहणार आहे. ३१०२ ब्लॉक आहेत. एका ब्लॉकमध्ये चारशे ते आठशे लोकसंख्या राहणार असून, १५० घरांची मर्यादा आहे. ३६ ते ४४ हजार दरम्यान लोकसंख्येचा एक प्रभाग होईल. म्हणजे सरासरी ४० हजार लोकसंख्येतून नगरसेवक निवडून येईल.
तळवडे गावठाणापासून नव्याने प्रभाग तयार करण्यास सुरुवात झाली. सांगवीत प्रभाग रचनेचा शेवट होईल. सांगवीतील शेवटचा प्रभाग २ सदस्यांचा राहू शकतो. २५ सदस्यांची समिती प्रभाग रचनेचे काम करत आहे. गुगल मॅपद्वारे सीमांकन केले जात आहे.
– बाळासाहेब खांडेकर, उपायुक्त – निवडणूक विभाग…