- संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे फर्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- राज्याचे पर्यटनमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. या बैठकीस शिवसेनेचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांच्याशी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, राहुल कलाटे, सचिन भोसले, नीलेश बारणे, अमित गावडे, मीनल यादव, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे आदी उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गजानन चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे बैठकीस अनुपस्थित होते. त्यावर ठाकरे यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस द्या, अशी सूचना केली.
याबाबत प्रतिकिया देताना शिवसेना शहरप्रमुख म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी पुण्यात शहरातील आढावा बैठक घेतली. या बैठकीस येणार नसल्याचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी कळविले होते. मात्र, अश्विनी चिंचवडे यांनी तशी कोणतीही कल्पना दिली नव्हती.