- वाकड पोलिसांकडून दोघांना हातकड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- वाकड येथील दत्त मंदिर परिसरातील बांधकाम साईटवरील ब्रॉडवे टॉवर क्रेनवर चढून बांधकाम कामगाराने ‘माझे पैसे द्या. नाहीतर मी वरून उडी मारून आत्महत्या करणार आहे’ असे मोठ्याने ओरडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने हा प्रकार एकाच्या सांगण्यावरून केला. हा प्रकार गुरुवारी (दि. ३०) सकाळी घडला. राजनारायण रामप्रसाद चौधरी (वय ३१, रा. दत्तमंदिर रोड, वाकड), बाळासाहेब विश्वनाथ कोळी (रा. वाकड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. मकरंद अरविंद प्रभू (वय ४८, रा. सुसरोड, पाषाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.