- अज्ञात व्यक्तीविरोधात चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- एसबीआय बँकेचे योनो अॅप्लिकेशन ऑपरेट होत नसल्यामुळे फिर्यादीने ऑनलाईन कस्टमर केअर 9339601192 या क्रमांकावर फोन केला. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला anydes app हे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर बँकेतील बॅलन्स तपासला असता बँक खात्यात केवळ दहा रुपये शिल्लक असल्याचे दिसले. बँकेत चौकशी केल्यावर बचत खात्यातून आणि फिक्स डिपॉझिटमधील लोन केलेले पैसे 31662960569 व 32962463275 या खात्यांवर ट्रान्स्फर झाले. तसेच एटीएममधून देखील २० हजार रुपये काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली. एकूण दोन लाख २७ हजार ५५० रुपये फिर्यादीच्या बँक खात्यातून परस्पर काढून अज्ञाताने फिर्यादीची फसवणूक केली.
हा प्रकार मंगळवारी (दि. २८ सप्टेंबर) सकाळी चिंचवडगाव येथे घडला. रविराज सतीश कर्णे (वय ३२, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.