- टाटाकडून स्पष्टीकरण; लिंक कोणाला फॉरवर्ड करु नका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- सोशल मीडियावर व्हायरल होणारी टाटा च्या १५० व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनची लिंक फेक असल्याने नागरिकांना त्यावर क्लिक करु नये आणि ही लिंक कोणाला फॉरवर्ड देखील करु नये, असे आवाहन टाटा कंपनीने नागरिाकंना केले आहे.
यासंदर्भात केलेल्या लिंकमध्ये त्यांनी लिहिले की, “या फेक प्रोमोशनल अॅक्टीव्हीटीसाठी टाटा ग्रुप आणि टाटाच्या इतर कंपन्या जबाबदार नाहीत. नागरिकांनी या लिंकला क्लिक आणि फॉरवर्ड न करण्याचे कंपनीकडून आवाहन केले जात आहे.”
पहा टाटा ग्रुपचे ट्विट:-
#FakeNotSafe
Tata Group or its companies are not responsible for this promotional activity. Please do not click on the link and/or forward it to others.Know more here: https://t.co/jJNfybI9ww pic.twitter.com/AA38T0oqHn
— Tata Group (@TataCompanies) October 1, 2021
काय आहे प्रकरण …
गेल्या काही दिवसांपासून व्हाॅट्सअपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये टाटा समुहाच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विजयी झाल्यास कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या व्हायरल मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली आहे. मात्र, टाटा ग्रुपकडून हे सर्व खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे.