- अचानक लागलेल्या आगीमुळे दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२१) :- भोसरीतील आळंदी रस्त्यावरील आर. जे. फॅशन नावाच्या कपड्यांच्या दुकानाला मंगळवारी (दि. ५) रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.
घटनेची माहिती मिळताच भोसरी व चिखली अग्निशमन उपकेंद्राचे प्रत्येकी एक आणि मुख्य अग्निशमन केंद्राचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तासाभरात अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र, दुकानातील पंचवीस लाखांच्या आसपास कपडे जळून खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी अग्निशामक विभागाला दिली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, असे अग्निशामक विभागाकडून कळविण्यात आले आहे.