- तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२१) :- विवाहितेकडे वारंवार हुंड्याची मागणी केली. विवाहितेने त्यासाठी नकार दिला असता तिला शिवीगाळ, मारहाण करून दुसरे लग्न करण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ३ जानेवारी ते ४ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान नखातेवस्ती, रहाटणी आणि तळेगाव दाभाडे येथे घडली. २६ वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिराज रईस खान (वय ३१), रईस खान (वय ६०), सकुनीसा रईस खान (वय ५५), सिराज रईस खान (वय ३३), आफ्रिन सिराज खान (वय २४), सानिया रईस खान (वय २२), रुक्सार रईस खान (वय २४), बद्रुनिसा खान (वय २८), मेहेर खान (वय २६, सर्व रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे तपास करीत आहेत.