- तीन सदस्यीय प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखडा तयार करण्याचे पालिकेला आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेस मंगळवारी (दि. ५) मिळाले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने आज बुधवार (दि. ६) पासून कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या तीन सदस्यीय प्रभागरचनेच्या निर्णयावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० सप्टेंबरला मंजुरी दिली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पिंपरी – चिंचवड महापालिकेस तसा आदेश दिला आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम मंगळवारपासून सुरू करावे, असे त्या आदेशात म्हटले आहे.
तसेच, निवडणूक आयोगाने एक सदस्यीय वॉर्डरचनेचा २५ ऑगस्टला दिलेला आदेश रद्द केल्याचे नमूद केले आहे. नव्या तीन सदस्यीय प्रभागरचनेमुळे पिंपरी – चिंचवड शहरात एकूण ४३ प्रभाग निर्माण होणार आहेत. त्यात एकूण ४२ प्रभाग हे ३ सदस्यीय असतील तर एक प्रभाग २ सदस्यीय असण्याची शक्यता आहे.
आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागरचनेसाठी स्थापन केलेल्या २५ अधिका-यांची बैठक होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रभागरचनेच्या कामास सुरुवात होईल.
– बाळासाहेब खांडेकर (महापालिका सहायक आयुक्त)…