- संबंधितांची पाऊणेतीन लाखांची फसवणूक; काळेवाडीतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२१) :- मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत मिळणार असल्याचे सांगून आरोपी महिलेने फिर्यादी आणि अन्य लोकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी आणि अन्य लोकांकडून दोन लाख ७६ हजार ५०० रुपये घेतले.
लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत न देता तसेच त्यांचे पैसे परत न देता दोन लाख ७६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना १४ जून २०२१ ते ४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत गुलमोहर गार्डन, विजयनगर, काळेवाडी येथे घडली.
चेतन सुखदेव पंचभाई (वय ३८, रा. गुलमोहर गार्डन, विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २६ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करीत आहेत.