न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि, ०६ ऑक्टोबर २०२१) :- वाकडच्या म्हातोबानगरमध्ये पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला दोनजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले.
अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे १३ हजार ७१५ रुपये किमतीचा ५२७ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. ही कारवाई मंगळवारी (दि. ५ ) दुपारी सव्वाएकच्या सुमारास पोलिसांनी केली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रसाद जांगिलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पूनितकुमार विवेक शेट्टी (वय २८), अशोक मरिबा तुपेरे (वय २०, दोघे रा. म्हातोबानगर, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.