- कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि, ०६ ऑक्टोबर २०२१) :- हुंदाई कंपनीचे स्वामित्व असलेल्या एकाने त्याच्या फायद्यासाठी वेगवेगळे ३१ हजार ७१० रुपये किमतीचे २९ बनावट स्पेअर पार्टस विक्रीसाठी त्याच्या दुकानात ठेवले. यामुळे हुंदाई कंपनीची आणि गि-हाईकांची फसवणूक झाली.
ही घटना कासारवाडीतील पोपटलाल डी मेहता स्पेअर पार्टस दुकानात मंगळवारी (दि. ५) दुपारी चार वाजता घडली. हुंदाई कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी रेवणनाथ विष्णू केकाण (वय ३८, रा. हडपसर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिनेश गंडालाल शहा (वय ६५, रा. दापोडी) याच्यावर भारतीय दंड विधान कलम ४२०, कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.