- आगीत महत्वाच्या फाईली खाक; कोटींचे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि, ०६ ऑक्टोबर २०२१) :- थेरगाव परिसरात आज बुधवारी (दि. ०६) रोजी स. ९.४५ च्या दरम्यान चोलामंडलम इन्वेस्टमेंट आणि फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फर्निचरसह महत्वाचे कागदपत्रे असे मिळून तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली.