न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे अखेर महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि महाराष्ट्रातील मंदिराचे दरवाजे उघडले.
त्याचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डीतील खंडोबा मंदिरात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात महाआरती केली.
त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, चंद्रकांत दानवले, चिंचवड विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, पिंपरी विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष सुशांत साळवी, सचिन मिरपगार, सुरेश सकट, विष्णू चावरीया, नितीन चव्हाण, नाथा शिंदे, विनोद भंडारी, राजू येवते, निलेश ननावरे, तुकाराम शिंदे, के के कांबळे, निलेश कांबळे, रोहन कांबळे, देवेंद्र निकम, सागर सोनटक्के, नारायण पठारे, संजय मोरे, विक्रम सोरटे, प्रफुल्ल कसबे, किसन हांडे, पप्पू शिंदे, मंगेश गायकवाड तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
















