- ‘कोव्हिशिल्ड’चे ऑनलाईन २९५ तर, KIOSK द्वारे ११८० डोस राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी कोविडचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने २९५०० ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस शुक्रवारी (दि. ०८) रोजी ५९ लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहेत.
पहिला व दुसरा डोस हा लाभार्थ्यांना एकूण २९५०० पैकी पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे ११८० इतके कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने २९५ इतके डोसेस व उर्वरीत २८०२५ इतके डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने २८०० ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोसेस ८ लसीकरण केंद्रांवर देण्यात येतील.
एकूण २८०० पैकी ४०० कोविड डोस पहिल्या डोससाठी राखीव असून त्यातील केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे १६० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ४० डोसेस व उर्वरीत २०० डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
उर्वरित २४०० डोसेस दुसऱ्या डोससाठी राखीव असून त्यातील पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे १६० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ४० डोसेस व उर्वरीत २२०० डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
ज्या नागरिकांचा ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. ८) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी पिं. चि. मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
















