न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १६ जाने.) :- जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दही, दुधाने अभिषेक करून, राज्याभिषेक सोहळा दिन साजरा केला.
उद्योजक सचिन आहेर यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून, महाराजांचा जयघोष करण्यात आला. संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या आवारात यावेळी स्वछता अभियान राबविण्यात आले.
या समारंभास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विकास आहेर, समाधान पाटील, अंगद गायकवाड, सोन्या आहेर, बाळू गायगोळ , खंडू गुरव, पंकज कडू, अमोल कळंब, राजा सिंग, आकाश राक्षे, चिंचवड परिसरातील शिव शंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











