- ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी कोविडचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस शनिवारी (दि. ०९), रविवारी (दि. १०), ते सोमवारी (दि. ११) रोजी ८ लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन ६४०० प्रमाणे कोविड लसी देण्यात येणार आहेत.
लसीचा कोटा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ५० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ५० टक्के लाभार्थी या पद्धतीने देण्यात येणार आहे. (पिं.चि.मनपावार्डनिहायकेंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी लाभार्थींना प्राधान्य राहील.) लसीकरणाचा कालावधी सकाळी ८.०० ते रात्री १०.०० पर्यंत असणार आहे.
वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी कोविडचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस शनिवारी (दि. ०९), रविवारी (दि. १०), ते सोमवारी (दि. ११) रोजी ४८ लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन २४००० प्रमाणे कोविड लसी देण्यात येणार आहेत.
लसीचा कोटा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ५० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ५० टक्के लाभार्थी या पद्धतीने देण्यात येणार आहे. (पिं.चि.मनपावार्डनिहायकेंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी लाभार्थींना प्राधान्य राहील.) लसीकरणाचा कालावधी सकाळी ९.३० ते रात्री ५.०० पर्यंत असणार आहे.
वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोसेस शनिवारी (दि. ०९), रविवारी (दि. १०), ते सोमवारी (दि. ११) रोजी ८ लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन २८०० प्रमाणे कोविड लसी देण्यात येणार आहेत.
एकूण २८०० पैकी ४०० कोविड डोस पहिल्या डोससाठी राखीव असून त्यातील कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने २०० डोसेस तर उर्वरीत २०० डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य राहील. उर्वरित २४०० डोसेस दुसऱ्या डोससाठी राखीव असून त्यातील कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने १२०० डोसेस तर उर्वरीत १२०० डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य राहील. लसीकरणाचा कालावधी सकाळी ९.३० ते रात्री ५.०० पर्यंत असणार आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार, (दि.०९) रोजी लसीकरण केंद्रावर पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी १०.०० ते सायं ०५.०० या वेळेत कोविड-१९ लसीचा पहिला डोस १०० व दुसरा डोस हा १०० क्षमतेने देण्यात येणार आहे.
ज्या नागरिकांचा ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी पिं. चि. मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. दि.०९/१०/२०२१ ते ११/१०/२०२१ साठी कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी उद्या (दि. ०९) रोजी सकाळी ८.०० वाजण्यापुर्वी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
















