- विवाहितेने केलेही तसेच; मात्र, पुढे झाले असे….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- पतीच्या आरोपी मित्राने पिडीत महिलेशी मैत्री केली. तिच्याशी प्रेमसंबंध ठेवत बाहेर फिरायला जाण्याच्या आमिषाने डुडुळगावातील एका लॉजवर तिला नेले. तिथे तिला ‘तु तुझ्या नवऱ्याला सोड, त्याच्याकडून घटस्फोट घे, तुझा नवरा काही कामाचा नाही, मी त्याला चांगला ओळखतो, तुझा घटस्फोट ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करतो’, असे अमिष दाखविले.
फिर्यादी महिलेने त्याला नकार दिला असता, आरोपीने जबरदस्तीने फिर्यादीशी शरिरसंबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीला आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगितले. मात्र, आरोपीने तू तुझ्या नवऱ्याला आपले प्रेमसंबंध सांगून टाक, घटस्फोट घे, मग आपण लग्न करू, असे सांगितले.
आरोपीवर विश्वास ठेऊन ऑगस्ट २०२१ मध्ये फिर्यादीने पतीला सर्व प्रकार सांगितला. फिर्यादीचा पती फिर्यादीला घटस्फोट देण्यास तयार झाला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला फोन करून सांगितले. आरोपीने मात्र, लग्नास नकार देत फिर्यादी यांची फसवणूक केली. ऑगस्ट २०२० ते ०७ ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली. २१ वर्षीय पिडीत महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजीत राजेंद्र क्षीरसागर (रा. टिंगरेनगर, गल्ली नंबर एक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















