- कोविड डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश..
- नाट्यगृहे व सिनेमागृह लवकरच खुली होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालये आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून (दि. ११) सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यानांच प्रवेश मिळणार आहे. बाहेर जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
विधानभवन येथे करोना आढावा बैठकीनंतर पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरातील हॉटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालयांमध्ये १०० टक्के उपस्थितीत परवानगी असणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्रशिक्षण केंद्र सुरू राहणार आहेत.
सिनेमागृहांना लवकरच परवानगी मिळणर असून नाट्यगृहे व सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले असून, याबाबतचा निर्णय दि. २२ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
















