- महिलेला गुंगारा देत चोरट्याने पर्स लांबविली; पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०२१) :- कागदपत्र व सामान घेण्यासाठी फिर्यादी या त्यांच्या पिंपरीतील जुन्या घरी सेनट्री चाळ येथे आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची १०० रुपये किमतीची पर्स चोरून नेली.
त्या पर्समध्ये एक लाख रुपयांची रोकड होती. रुक्मिणी जिया धुंबड (वय ५०, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी गुरुवारी (दि. ७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन ऑक्टोबर रोजी घडली.