- अंदाजे ३६ ते ४४ हजार नागरिकांचा एक प्रभाग होण्याची दाट शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. अधिकाऱ्यांची समिती कच्च्या प्रारूप आराखड्याचे काम करत आहे. शहराच्या उत्तर दिशेकडून म्हणजेच तळवडेमधून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेवट दक्षिण दिशेला म्हणजेच सांगवी किंवा रावेतला होऊ शकतो.
२०११ च्या जनगणनेनुसार पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे, त्यात अनुसूचित जाती (एससी) २ लाख ७३ हजार ८१०. तर अनुसूचित जमाती (एसटी) ३६ हजार ५३५ लोकसंख्या आहे. एकूण १२८ नगरसेवक असणार आहेत. तसेच ४३ प्रभाग राहणार आहेत. ४२ प्रभागात ३ तर एका प्रभागात २ उमेदवार असतील. अंदाजे ३६ ते ४४ हजार नागरिकांचा एक प्रभाग राहील.
नगररचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे, नगररचनाकार प्रशांत शिपी, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, बापू गायकवाड, चंद्रकांत मुठाळ यासह २५ जणांची समिती प्रभाग रचनेचे काम करत आहे. प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा दिलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून समजली.