- काय म्हणाले वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- “केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सीजचा आणि सत्तेचा वापर हा राजकीय कारणासाठी करत आहे. यापूर्वीच्या काळात राजकारणात कधीही अशी परिस्थिती पाहिलेली नव्हती.
एखाद्याच्यी घरी चौकशी करणे हे ठीक आहे, परंतु त्याच्या सगळ्याच नातेवाईकांच्या घरी देखील, जाणं आणि त्रास देणं हे काही बरोबर नाही.” असं गृहमंत्री दिलीप वळेस पाटील म्हणाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पिंपरी-चिंचवड शहरात एका खासगी कार्यक्रमानिम्मित्त आले असता प्रसिद्धी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, एनसीबीने कारवाई करताना जे साक्षीदार म्हणून किंवा पंच म्हणून ज्या लोकांना बरोबर नेलं, ते एका पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आहेत आणि जो गोसावी आहे तो मला वाटतं पुण्याचा फरासखानी पोलीस स्टेशनच्या एका केसमध्ये एक फरार आरोपी देखील आहे. फरार आरोपीला घेऊन जर एनसीबी त्या ठिकाणी पंच करायला लागली, तर हे कितपत बरोबर आहे मला माहीत नाही.” असंही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.
















