- पिंपरी चिंचवड शहरात कोविड डोसचा दुष्काळ संपला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- लसीकरण शंभर टक्के झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील लसीकरणाने वेग घेतला आहे. शहरातील वीस टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला नाही.
राज्य सरकारच्या मिशन कवच कुंडल मोहिमेला प्रतिसाद द्यावा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण सुरू केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. शहरातील वीस टक्के नागरिकांनी पहिलाही डोस घेतला नाही. या नागरिकांनी त्वरित पहिला डोस घ्यावा ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसराही डोस घ्यावा.
महापालिकेने आता गृहनिर्माण सोसायट्या, घरोघरी, चाळीच्या ठिकाणी जाऊन लसीकरण सुरू केले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियोजन करून घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लसीकरण केंद्रांच्या वेळेमध्येदेखील वाढ केली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहावाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरू असता, अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
















