- स्वत:हून नोंद करा अनं मिळवा सामान्यकरात ५ टक्के सवलत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ माझी मिळकत, माझी आकारणी ‘ योजना जाहीर करण्यात आली आहे.
त्याअंतर्गत स्वयंघोषणेद्वारे मिळकतीची स्वत:हून नोंद करणाऱ्या नागरिकांना सामान्यकरात ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व उपायुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.
या योजनेबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळकतधारकांनी स्वतःचा व मिळकतीचा तपशील नमूद केल्यानंतर मिळकतीचे संभाव्य बिलाची रक्कम तत्काळ माहिती होणार आहे. ज्या नवीन व वाढीव मिळकतीची नोंद झाली नसल्यास ती नागरिकांनी स्वतःहून करावी. ही सवलत सन २०२१-२२ या एकाच वर्षांसाठी मिळणार आहे.