- आरोपीला रावेतमधून पिस्तुलासह अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केलेला आरोपी तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने शनिवारी दुपारी पावणे पाच वाजताच्या दरम्यान रावेत येथून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि कार असा एकूण बारा लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस शिपाई शुभम कदम यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करण रतन रोकडे (वय २३, रा. रोकडेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.