- फ्लॅटचा ताबा न देता फिर्यादीची ६८ लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- हिंजवडीतील प्रिस्टिन होरिझोन कं. मध्ये फिर्यादी व इतर लोकांकडून आरोपींकडून ६८ लाख ४९ हजार रूपये घेतले. मात्र, फ्लॅटचा ताबा अथवा कोणत्याही प्रकारचे शासकिय नोंदणी केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना २०१८, २०१९ आणि २०२० या दरम्यान घडली. योगिता विमल दास (वय ३८, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी शुक्रवारी (दि. ८) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार प्रतिक ओमप्रकाश अगरवाल, मोना अगरवाल व त्याचा भाऊ, शुभम अगरवाल व कंपनीचे मॅनेजर आणि किरण कुंभारकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.