न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथील विशेष समारंभात ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री दिपाली सय्यद पुरस्काराची घोषणा करताना म्हणाल्या की, कोरोना १९ च्या राष्ट्रीय महामारीमुळे संपूर्ण जग संकटात असताना सुद्धा समाजातील काही कार्यकर्ता, डॉक्टर, पोलिस, पत्रकार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी ढाल म्हणून या संकटाचा सामना केला. मानवतेच्या या देवदुतांचा राज्यस्तरीय निवड समितीने कार्यकर्त्यांची निवड करत कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्याचे आयोजन केले. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना योध्दा म्हणून अनेक नावे घेऊन समिती पुढे आली. या सर्वातून युवा खेळाडू योगेश लांडगे यांचे कार्य उल्लेखनीय वाटले. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. योगेश भाऊ यांनी कोरोना काळात अतिशय मोलाचे काम केले आहे. यामध्ये अन्नधान्य कीट, गरिबांना भोजन थाळी, रुग्नांना बेडची उपलब्धता, आवश्यकांना औषधांचा पुरवठा, रुग्णांच्या नातेवाईकांना गृहविलगीकरण्यासाठी मदत, औषध फवारणी, आदी उपक्रमांबरोबर जे या संकटात सापडले त्या कुटुंबीयांसाठी सर्वाेतोपरी मदत उपलब्ध केली. ‘जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’ या उक्तीप्रमाणे आपले कुटुंब समजून भोसरी परिसरात कडक लॉकडाउनच्या काळात त्यांनी योगेशभाऊ लांडगे युवा मंचच्या माध्यमातून मोलाचे कार्य केले. भटक्या कुत्र्यांना भाकरी आणि गायींना चारा व पानी याची देखिल सोय केली.
आयुष्यमान भारत या योजनेतून सुमारे ६ हजार जणांना रुपये ५ लाखांची विमा मिळवण्यासाठी कार्डचे वापर करून त्यांना संकटाचा सामना करण्याचे आत्मबल दिले. पिंपरी चिंचवड शहरात सर्वात जास्त या योजनेचा लाभ योगेशभाऊ लांडगे यांच्या सहकारातून उपलब्ध झाला आहे व हे वेगळे काम गौरवास्पद ठरले.
योगेशभाऊ लांडगे म्हणाले, ‘मी सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असून आपण समाजाचे जबाबदार घटक आहोत याच भावनेतून उभा राहिलो. यासाठी हजारो हात माझ्या मदतीला धावून आले. आमदार महेशदादा लांडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले व या सर्वांचा मी आभारी आहे’.