- पिंपरी चिंचवड पोलिसांची कराडमध्ये जाऊन कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२१) :- गुंडा विरोधी पोलिसांच्या पथकाला रावण टोळीतील मोक्का आणि खुनाच्या प्रयत्नातील फरार गुन्हेगारांच्या शोधासाठी गोवा, महाबळेश्वर, कराड येथे शोध मोहीम राबवून आरोपींचा माग काढून मुसक्या बांधण्यात यश आले आहे.
कराड तालुक्यातील घारेवाडी गावानजीक पिंपरी-चिंचवड पोलीस आणि कराड पोलिसांनी मिळून सापळा रचून आरोपींना बेड्या घातल्या आहेत. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
सचिन नितीन गायकवाड (वय २१, रा. चिखली गावठाण), सुरज चंद्रदत्त खपाले (वय २२ रा. रोकडेवस्ती, चिखली), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (वय २१, रा. रोकडेवस्ती, चिखली), अक्षय गोपीनाथ चव्हाण (वय २४, रा. चिखली गावठाण), अनिरुद्ध उर्फ बाळा उर्फ विकी राजू जाधव (वय २४, रा. जाधववस्ती, रावेत) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.