- नियुक्तीबद्दल वकील संघटनेकडून अभिनंदनांचा वर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड नोटरी असोसिएशनच्या सहसचिवपदी अॅड. कैलास मुरलीधर जाधव तर सदस्यपदी अॅड. संपत शंकरराव भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नोटरी असोसिएशनच्ये अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.
या निमित्त मोरवाडी येथे छोटेखानी कार्यक्रमास संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. दिनकर बारणे, अॅड. सूरज खाडे, अॅड. विजय भोसले, अॅड. निलेश कामठे, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. कांता गोरडे, अॅड. विभा सिंग, अॅड. विठ्ठल पोखरकर, अॅड. अल्पना रायते आणि अॅड. पूनम स्वामी आदी उपस्थित होते.